रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली तर्फे गोशाळेस कुंड व पशुखाद्य भेट :


भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीतर्फे शहरातील जामनेर रोडवरील गोशाळेला पाणी पिण्यासाठी ४ कुंड, मक्या पासून बनवलेले पशु खाद्य (कुट्टी )ची मदत (भेेेट ) देण्यात आली . अश्या दानशूर दात्यांमुळे गोसेवकांना गोरक्षण करण्यास नक्कीच मदत होते . डॉ निलेश झोपे यांनी कुंड व पशुखाद्य देण्यास सहकार्य केले .

यावेळी अध्यक्ष नुतन फालक , सचिव मनीषा पाटील , रो हिरामण फालक, डॉ निलेश झोपे , शिव छत्रपती गोरक्षक अभियान
अंतर्गत गोमाता उपचार व सेवा केंद्राचे गोरक्षक रोहित महाले ,
रोहन सपकाळे, तुषार भोसले , दिवेश अडथळे ,
गोलु वारके, उपस्थित होते .