भुसावळ शहरात घरफोडी सत्र सुरूच ! – तुकाराम नगरात पुन्हा दोन घरफोडी :

भुसावळ प्रतिनिधी –भुसावळ शहरात घरफोडी सत्र सुरूच असून तुकाराम नगरात पुन्हा दोन घरफोडी झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत .

शहरातील एकदंत रेसिडेन्सी तुकाराम नगर व विनायका कॉलनी,भुसावळ मधील दोन घरातील १,०३,५०० किंमतीची रोख रक्कम,सोन्या – चांदीचे दागिने अज्ञात कोणीतरी चोरट्यांने घेऊन पोबारा झाल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे

दिनांक २३/१/२०२३ रोजी सकाळी ०७.०० ते दिनांक ३०/१/२०२३ रोजीच्या सकाळी ०९.०० वाजेला दरम्यान भुसावळ शहरातील एकदंत रेसिडेन्सी तुकाराम नगर फिर्यादीच्या घराचे व साक्षीदार सुधाकर सावळाराम नाईक राहणार विनायका कॉलनी,भुसावळ यांचे घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील एकूण १,०३,५०० किंमतीची रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीच्या संमती वाचून लाबडीच्या इराद्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरून नेले म्हणून फिर्यादी – यशोदा बाई पंढरीनाथ कुंभार वय ६६ राहणार एकदंत रेसिडेन्सी तुकाराम नगर भुसावळ यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ५०/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ राजेश पाटील करीत आहे.