भुसावळ शहर महिला काँग्रेस तर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

भुसावळ शहर महिला काँग्रेस तर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन

भुसावळ – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी भुसावळ शहर महिला काँग्रेस तर्फे गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील उर्फ बंटी भैया पाटील भुसावळ शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष इस्माईल पैलवान गवळी ,भुसावळ शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई भावटे ,भुसावळ नगर परिषदेचे माजी नगरसेवक रमजान भाई ठेकेदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनीलभाऊ जवरे ,भुसावळ शहरातील नामवंत वकील एडवोकेट फेगडे , गांधी विचारधारेवर काम करणारे एडवोकेट तळले सर ,श्री कुंजबिहारीजी तथा शैलाताई सावंत ,भुसावळ शहर आदिवासी विभागाचे अध्यक्ष अन्वर,भुसावळ शहरातील प्रमुख प्रतिष्ठित व गांधीविचारावर काम करणारे सर्व जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते .

सुरुवातीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील उर्फ बंटी भैया यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर जेष्ठ गांधी विचारक कुंजबिहारी यांनी गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार केला तसेच गांधीजींनी केलेला कार्य व गांधी विचाराचे महत्त्व योगेंद्र पाटील व कुंजबिहारी

यांनी या ठिकाणी मांडल.ज्येष्ठ गांधी विचारक श्रीमती शैलाताई सावंत यांनी यानिमित्ताने गांधीजी यांच्या विचाराचे महत्त्व या संदर्भामध्ये पत्रक वाटून जनजागृती केले . त्यानंतर सुनील जवरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले