भुसावळ – येथील श्री साई निर्मल फाउंडेशन व श्री नरेंद्र मोदी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पंतप्रधान सी नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे वयाच्या शंभराव्या वर्षी दुःखद निधन झाले . माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाच्या जडणघडणीमध्ये श्रीमती हिरा बेन यांचा मोलाचा वाटा होता . आपल्या आईच्या निधनानंतर अंतिम संस्कारानंतर लागलीच तीन तासांमध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या त्यांच्या कार्यालयीन कामकाजास सुरुवात केली.
याप्रसंगी श्री नरेंद्र मोदी विचार मंच व श्री साई निर्मल फाउंडेशन चे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी आपले श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमास राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे जळगाव जिल्ह्याचे सचिव चंद्रशेखर पाटील, शेतकरि संघर्ष संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी वराडे आप्पासाहेब, गौरव नन्नवरे, ज्येष्ठ नागरिक समाजसेवक आर के कोळी, अर्जुन भैय्या, कैलास चौधरी, मोहन कासार, कपिल पहुरकर, उपस्थित होते



