महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी…


भुसावळ – शालेय विद्यार्थांचे आरोग्य सुदृढ असावे शिक्षणा सोबत उत्तम आहार व निरोगी आरोग्य असावे या दृष्टिकोनातून शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा येथील महिला क्रिडा मंडळ भुसावळ यांनी शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुंन उमटविला . या उपक्रमात जामनेर रोड वरील सोनिच्छा वाडी भागातील भागीरथी प्रार्थमिक शाळेतील सुमारे १०० मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली .

लहान मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी व व्हिटॅमीनच्या कमतरता यासाठी म्युनिसिपल हाँस्पिटल कडून डॉ. संकेत तळेले, डॉ. धनश्री चौधरी, डॉ. पुर्वा नमाडे व प्रियांका पाटील या तज्ञ डाॅक्टरांनी मुलांची तपासणी करून औषधे दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला क्रिडा मंडळच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी मुलांना चांगल्या आरोग्याचे महत्व सांगून आरोग्य चांगले असेल तर अभ्यास चांगला होतो असे सांगितले व डाॅक्टरांचे आभार मानले.
शाळेचे मुख्याध्यापक अजय फेगडे सर, श्री. रामकृष्ण इतवारे, सौ. सविता वानखेडे मॅडम, जयमाला पाटील यांनी सहकार्य केले.
एकुण १०० मुलांची तपासणी करण्यात आली.
महिला क्रिडा मंडळच्या
प्रोजेक्ट चेअरमन किरण चौधरी, मंगला पाटील , भारती चव्हाण, स्वाती भोळे, रश्मी ठोसर, वैशाली भगत, वैशाली पाटील, अनिता कवडीवाले हजर होत्या.