भुसावळ प्रतिनिधी – गेल्या दोन दशकात विज्ञानामुळे अमुलाग्र बदल घडलेले आहेत हजारो किलोमीटर असलेला व्यक्ती सोबत आपण सहज संवाद साधू शकतो तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करू शकतो अन्नधान्य वाहतूक इलेक्ट्रॉनिक्स वैद्यकीय क्षेत्र तसेच देशाच्या सुरक्षेसाठी लागणारे विविध साहित्य यामध्ये छोटे छोटे संशोधन झाल्याने अनेक वस्तू सहजगत्या उपलब्ध झाल्या या संशोधनामुळे बाजारपेठेत मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती देखील कमी झाल्यात कमी वेळेत कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम होत आहे आणि हे केवळ विज्ञानामुळेच शक्य आहे येणाऱ्या काळात यामध्ये आणखी भर पडून विचार करू शकणार नाहीत असे बदल केवळ विज्ञानामुळे होतील यासाठी विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच त्या दृष्टीने विचार केला पाहिजे म्हणजे मानवासाठी उपयोगी असे संशोधन निश्चित घडू शकते विज्ञानाच्या जोरावर तीच मानवाची प्रगती झाली असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांनी केले

सुनसगाव तालुका भुसावळ येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात पन्नास वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षण मंडळाचे व्हाईस चेअरमन हरी पांडू पाटील होते यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा पाटील माध्यमिक शिक्षक मंडळाचे सेक्रेटरी सुहास पाटील सदस्य दिलीप पाटील चंद्रकांत भोळे सुदाम भोळे दिगंबर पाटील मुख्याध्यापक जे पी सपकाळे एस एस अहिरे आदि उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीत शिक्षक संदीप महाजन व त्यांच्या चमूने इशस्तवन स्वागत गीत व विज्ञान गीत सादर केले यानंतर माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम व सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण व्हावी या गुणांची संगोपन व्हावे यासाठी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते या प्रदर्शनातील एकूण विद्यार्थी व शिक्षकांचे दहा उपकरणांची मांडणी जिल्हा स्तरावर होते
तालुक्यातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील उच्च प्राथमिक विद्यार्थी , माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी, प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा परिचर या पाच गटात 90 उपकरणे व शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन मांडण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के डी तायडे यांनी तर आभार एस एस अहिरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले


