भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात कला व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित विविध कलागुण दर्शन कार्यक्रम संपन्न झाला . त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे, तर अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. डॉ एम. आर. संदानशीव भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तर यांच्यासोबत ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक सचिव विष्णू चौधरी कोषाध्यक्ष संजय कुमार नाहाटा प्राचार्य डॉ सौ एम व्ही वायकोळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वाय.एम. पाटील, पर्यवेक्षिका प्रा शोभा तळेले हे उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांनी केले यानंतर विद्यार्थ्यांनी कला गुणांचे प्रदर्शन केले. यात एकल नृत्य, समूह नृत्य, एकल गीत, समूह गीत तसेच इतर स्पर्धा जसे की, मेहंदी, रांगोळी, केशरचना, स्लो सायकलिंग, संगीत खुर्ची , लिंबू चमचा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ अशी बक्षिसे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून प्रदान करण्यात आली यानंतर विद्यार्थ्यांनी समूहगीत व समूह नृत्याचा आस्वाद घेतला यानंतर उद्घाटक आदरणीय संजय सावकारे यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणात सांगितले की, अभ्यास हा केलाच पाहिजे, परंतु अशा व्यासपीठावर होत असलेल्या कार्यक्रमातूनच आपण आपला सर्वांगीण विकास करू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी अश्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा, जेणेकरून आपल्यातील स्टेज डेरिंग तयार होईल व आपण भविष्यात व्यासपीठावर बोलण्यास अधिक चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी नृत्यामध्ये किंवा इतर स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळविले असतील, त्या सर्वांचे त्यांनी अभिननंदन केले. असे अतिशय मोलाचे उदघाटन पर मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच आपल्या भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राहुलजी गायकवाड यांनी जी वाढती गुन्हेगारी चालली आहे, त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त होण्यासाठी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. यात त्यांनी सांगितले की आपलं पाहिलं कर्तव्य शिक्षण घेणे असून बाकी सर्व गोष्टी या वयोमानानुसार नंतर कराव्यात. असे मार्गदर्शन केले. यानंतर माजी उपप्राचार्य एम. आर. संदनशीव यांना पी. एच. डी. पदवी वयाच्या 65 व्या वर्षी संपादन केल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव विष्णू काका चौधरी यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन फलक यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विविध कलागुणदर्शन कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या व हा संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पाडावा, असे आवाहन केले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात मुलांनी अतिशय मनोरंजन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला मंडळ प्रमुख प्रा. डॉ. कुंदा चौधरी, सांस्कृतिक मंडळ प्रमुख प्रा. स्वाती चौधरी, तसेच समिती सदस्य प्रा. एम. एल. गोसावी, प्रा. एल. पी. टाक, प्रा. जे. पी. पाटील, प्रा. सौ. के. एम. राणे, प्रा. सौ. एस. एम फेगडे, प्रा. सौ. आर. एम. देशपांडे, प्रा. सौ. एस. एल. महाजन, प्रा. सौ. व्ही. वाय. पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनीनीचे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. एम. ए. चौधरी व प्रा. सौ. ए. एस. सपकाळे यांनी केले तर ऋण निर्देशन प्रा. प्रशांत पाटील आणि प्रास्ताविक प्रा. सौ. स्वाती चौधरी यांनी केले.


