..
भुसावळ – तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम
शासनाचे या वर्षाची थीम ध्येय वाक्य “इफेक्ट टू डिस्पोजल ऑफ केसेस इन कंजूमर कमिशन” हे जर साध्य व्हायचं असेल तर जिल्ह्यामध्ये दोन ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करावे ज्यामुळे ग्राहक तक्रारींचा निपटारा जलद गतीने होवुन ग्राहकांना न्याय मिळेल तसेच ग्राहक मंचात रिक्त असलेली पदांची भरती शासनाने केली तरी कामांचा ताण कमी होईल असे मत ग्राउंड फाउंडेशन चे जिल्हा सचिव ॲड. जास्वंदी भंडारी यांनी व्यक्त केले
तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री अंगद आसरकर होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्र ह दलाल सर अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जास्वंदी भंडारी जिल्हा सचिव, ॲड. कल्पना टेमाणी तालुका अध्यक्ष अ.भा.ग्रा.पंचायत, श्रीमती उज्वला बागुल तालुका अध्यक्ष ग्रा. क.फाऊडेंशन हे उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
प्र ह दलाल सर यांनी अन्नाची भेसळ ग्राहकांनी ओळखावी प्रसार माध्यमांनी व प्रसारण प्रशासनाने ग्राहकांच्या जागृतीसाठी काम करावे व प्रत्येक गल्ली गल्लीतून ग्राहक मंडळांची स्थापना व्हावी तरच ग्राहकांमध्ये जागता येईल व आपल्या हक्क अधिकारांसाठी लढा देता येईल असे मत व्यक्त केले
ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांनी सतर्कता बाळगावी कारण सध्या या माध्यमातून ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे असे मत एडवोकेट कल्पना टेमानी यांनी व्यक्त केले
श्रीमती उज्वला बागुल यांनी ग्राहकांच्या समस्या तक्रारी असतील त्या त्यांनी ग्राहक हितासाठी काम करणाऱ्या संघटनांकडे मांडावेत जेणेकरून ग्राहकाने योग्य दिशा दाखवण्याची व नावे मिळण्यासाठी त्यांना मदत करण्याचे माध्यम या संघटना बनतील म्हणून संघटनांचे सहकार्य घ्या असे आवाहन केले
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अंगद आसरकर यांनी ग्राहकांमध्ये जागृती व्हावी म्हणून असे कार्यक्रम शासनाकडून राबविले जातात तसेच ग्राहकांनी फसवणूक झाल्यास ग्राहक मंचाकडे न्यायासाठी धाव घ्यावी असे मत अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री भगवान शिरसाठ यांनी केले तर आभार श्रीमती रूपाली गुरव यांनी मानले कार्यक्रमासाठी श्री संजय सिंग चव्हाण उपाध्यक्ष ग्रा. क.फाउंडेशन ,ॲड. जयश्री देशमुख तालुका कोषाध्यक्ष ग्रा. क. फाउंडेशन , श्री प्रेम परदेशी अध्यक्ष पत्रकार संघ श्री अतुल नागरगोजे ,डॉ जगदीश पाटील तालुका सहसचिव, किरण बोलके , पुरवठा दुकानदार , ग्राहक तहसील कर्मचारी उपस्थित होते



