भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्डात पार पडलेल्या बैठकीत भुसावळ शाखेच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचे जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व जिल्हा मार्गदर्शक विकास महाजन यांच्या सूचनेनुसार जिल्हा सचिव अॅड. जास्वंदी भंडारी यांनी भुसावळ शाखेची कार्यकारणी जाहीर केली. नूतन कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले.
कार्यकारणी अशी – भुसावळ तालुकाध्यक्ष पत्रकार उज्ज्वला बागुल, तालुका उपाध्यक्ष संजयसिंग चव्हाण, तालुका सचिव डॉ. नितीन यावलकर, तालुका सहसचिव डॉ. जगदीश पाटील, तालुका कोषाध्यक्ष अॅड. जयश्री देशमुख, तालुका संघटक राजश्री नेवे, तालुका सदस्य मंदार बागुल , अॅड. विक्रम शेळके, अॅड, निलेश भंडारी, सौ. विजया पालखे.
24 डिसेंबर रोजी जागतिक ग्राहक दिन असून त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच ‘जागो ग्राहक जागो’ या उपक्रमाचा प्रचार व प्रसार करण्याचेही ठरवण्यात आले.


