डॉ उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात.


भुसावळ- येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धत चिमुकल्यांनी विविध प्रकारची वेशभूषा धारण केली होती. सांताक्लॉज,बेल,स्टार,गिफ्ट बॉक्स,क्रिसमस ट्री,एंजल, परी,कॅन्डल अशा विविध प्रकारच्या वेशभूषा धारण करून आपल्यातील कलागुण चिमुकल्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी उपस्थित पालक व शिक्षक वर्गाचे मन जिंकून घेतले, त्यानंतर ख्रिसमस सॉंग वर डान्स करण्यात आला. या स्पर्धेत नर्सरी,ज्युनिअर केजी व सिनियर केजी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेत भुसावळ रेल्वे विभागाचे एडीआरएम रुकमैय्या मीना यांची विशेष उपस्थिती लाभली, त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ मीना यांच्या हस्ते पार पडला. प्रसंगी मुख्याध्यापिका अनघा पाटील यांची उपस्थिती होती. सहभागीय विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल एडीआरएम रुकमैय्या मीना, मुख्याध्यापिका अनधा पाटील व सर्व उपस्थित पालक व शिक्षक वर्गाने कौतुक केले.कार्यक्रमास डॉ. नेहा वजे,डॉ.स्वप्नील पाटील, मुमताज हे परीक्षक म्हणून होते. सूत्रसंचालन साक्षी वाधवा,रचिता त्रिपाठी यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.