गरीब पेशंट साठी महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मदत..


भुसावळ – साईपुुष्प हाॅस्पीटलमधील गरीब पेशंटला आँपरेशन झाल्यावर लागणारे वाॅकर, क्रचर, बेल्टस, खुर्ची, एयरबेड, हिटिंग पॅड,देण्यात आले.
डाॅ. निलेश महाजन यांनी सांगितले की पेशंटचे काम संपल्यावर वाॅकर वगैरे सामान परत घेऊन पुढील पेशंटला देण्यात येईल. अशा प्रकारे अनेक गरीब गरजू पेशंटला त्याचा फायदा. होईल. अध्यक्ष आरती चौधरी यांनी सांगितले की महिला क्रिडा मंडळ नेहमीच सामाजउपयोगी कार्यात अग्रेसर आहे. आणि या साहित्याचा गरीब पेशंटनी लाभ घ्यावा. अजूनही काही साहित्याची गरज असल्यास आम्ही मदत करु. प्रोजेक्ट चेअरमन वैशाली भगत यांनी विशेष परिश्रम घेऊन ह्या उपक्रमाचे नियोजन केले.
या प्रसंगी क्रिडा मंडळाचे
सेक्रेटरी लता हो सकोटे, स्वाती नाईक, प्रमीला राऊळ, प्रभा पाटील , किरण चौधरी. संगीता पाटील , स्वाती भोळे , किरण शुक्ला , अनिता कवडीवाले , मानसी चौधरी , वैशाली ब-हाटे हजर होते.