भुसावळ- भुसावळ वकील संघ व विधी सेवा समिती यांच्यावतीने भुसावळ येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल या ठिकाणी संविधानाचा जागर उपक्रमांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला
वकील संघाकडून चार दिवसांपासून राबविलेल्या संविधानाचा जागर या उपक्रमाचा समारोप पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे झाला त्यानिमित्ताने ‘संविधानावर आधारित चित्र’ या विषयावर चित्रकला स्पर्धा शाळेत आयोजित केली यात 52 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती के. एम. पत्रे फौजदारी व दिवाणी न्यायाधीश क. स्तर भुसावळ यांनी भूषविले तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. तुषार पाटील अध्यक्ष, भुसावळ वकील संघ व ॲड. जास्वंदी भंडारी महिला प्रतिनिधी, भुसावळ वकील संघ यांची उपस्थिती होती पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल श्री आनंद शहा यांनी शाळेमार्फत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात संविधान दिनाचा कार्यक्रम शाळेत भुसावळ वकील संघाने आयोजित केला त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच संविधान कळेल असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले
न्यायाधीश श्रीमती के एम पत्रे यांनी अध्यक्षीय भाषणात मुलांना संविधान जाणून घ्या, आपल्याला जन्मतःच सर्व अधिकार संविधानाने दिले आहेत विद्यार्थ्यांनी शिस्तीचे
पालन करावे व देशाचे आदर्श नागरिक व्हावे असे यावेळी मुलांना संबोधले
विद्यार्थी शाळेत येतांना सर्रास दुचाकीचा वापर करतात, त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो तरी सुसाट वाहन चालवितात तसेच एका दुचाकी वर तीन जण बसतात यामुळे आपण कायद्याचा भंग तर करतोच पण जीवितहानी पण होऊ शकते म्हणून विद्यार्थ्यांनी परवाना नसताना वाहन चालवू नये व नियमांचे पालन करावे असे ॲड. तुषार पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले
आज मुलांच्या बरोबरीने नव्हे तर त्यांच्यापेक्षाही अधिक प्रगती मुली , महिलां सर्व क्षेत्रात करीत आहेत हा अधिकार त्यांना मिळाला तो संविधानामुळे, संविधान हे आपले राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचा अभ्यास सर्वांनी केलाच पाहिजे असे मत ॲड. जास्वंदी भंडारी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व चित्रकला स्पर्धेचे नियोजन ॲड.आय.आय.खान यांनी केले तर आभार श्री वाघमारे सर यांनी मानले यावेळी ॲड. प्रिया अडकमोल ॲड. यादव ॲड. जगझाप ॲड.कैजार भारमल ॲड. रमेश पांडव उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले



