भुसावळ, ता. २० : येथील भारत विकास परिषदेच्या शाखेतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय समुहगान स्पर्धेत ताप्ती पब्लिक स्कुलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाला पैठण येथे रविवारी (ता.२४) होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
आज सकाळ पासुनच प्रभाकर हॉल मध्ये रंगीबेरंगी वेशभूषा करून विविध संघ येण्यास सुरुवात झाली होती. १३ शाळांमधील ११५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते. साऱ्यांचाच उत्साह कौतुकास्पद होता. भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार व बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या संचालिका संगीता बियाणी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेत व्दितीय क्रमांक- डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम, तृतीय क्रमांक – दादासाहेब झांबरे माध्यमिक विद्यालय, उत्तेजनार्थ – अहिल्यादेवी कन्या विद्यालय यांनी पटकावला. रोख रक्कम, स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरूप होते. दुष्यंत जोशी, मोहन रावतोळे, गिता रावतोळे हे परिक्षक होते. दुपारी कर्नल चिगंप्पा यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी प्रभाकर हॉलचे संचालक चेतन पाटील, परिषदेचे प्रांत संघटन सचिव योगेश मांडे, शाखा पालक डॉ. निलीमा नेहेते, शाखेचे अध्यक्ष विलास फालक, भाग्यवेद अकादमीच्या राजेश्वरी निळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विलास फालक यांनी प्रास्ताविक केले तर डॉ गिरीश कुलकर्णी व राधा चव्हाण यांनी सुत्रसंचलन केले. स्पर्धा प्रमुख संजय लाहोटी, सचिव भुषण वाणी, डॉ. मनिषा दावलभक्त, श्याम माहेश्वरी, राजेश लढ्ढा, मुख्याध्यापक हरीश कोल्हे, गौरव हिंगवे, विजय जोशी, सतिश खडायते, गोपाल हेडा, श्रीकांत जोशी आदींनी स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले



