भुसावळ – टी. इ. टी. ग्रस्त शिक्षकांना औंगाबाद खंड पीठाचा दिलासा दिला असून वेतन व सेवा सुरूच राहणार आहे

सध्या राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा,म्हणजेच टी. इ. टी. परीक्षा घोटाळा खूपच गाजत आहे. ह्या परीक्षेत गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून राज्यातील ७४७८शिक्षकांना अपात्र ठरून ऑगस्ट पासून त्यांचें वेतन बंद करण्याचे आदेशही शासनाने दिले होते त्या नुसार वेतन बंद झाल्याने हजारो शिक्षक व त्याचे कुटुंब हवालदिल झाले होते त्यानंतर शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्याचे प्रक्रिया सुरू झाली होती अनेक मोठे अधिकारीही ह्या घोटाळ्यात सहभागी असल्याने चोकशी अद्याप सुरूच आहे पण पहिला बळी मात्र गरीब शिक्षकांचा ! ह्या अन्याया विरोधात ज्येष्ठ शिक्षक नेते प्र. ह.दलाल यांनी शिक्षकांना एकत्र जम उन एक ग्रुप तयार केला अन् औरंाबाद खंड पीठात याचिका दाखल केली अवघ्या पंधरा दिवसात आज न्यायलयाने नोटीस आदेश देऊन शिक्षकांचे वेतन रोखता येणार नाही व त्यांना सेवेतून कमी ही करता येणार नाही असे आदेश दिले आहेत ह्या प्रकरणी शिक्षकांचे वकील श्री शैलेश ब्रह्मे यांनी शासकीय निर्णयाची अक्षरशः चिरफाड केली.त्यामुळे ह्या तुघलकी निर्णया विरुद्ध निकाल लागून भीती ग्रस्त शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी माहिती शिक्षकांचे नेते प्र ह.दलाल यांनी दिली आहे.


