स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम ;

भुसावळ – भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वराज्य महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रम जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत उत्साहात पार पडले.
9 ते 17 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम घेण्याच्या सूचना शासनातर्फे देण्यात आल्या होत्या. त्यानुसार चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामूहिक गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच तीन दिवस ध्वजारोहण करण्यात आले. पहिल्या दिवशी माजी विद्यार्थिनी आफरीन पिंजारी, दुसऱ्या दिवशी सैनिक गोपाळ पाटील तर तिसऱ्या दिवशी स्वातंत्र्यदिनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लता मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरी काढण्यात येऊन विविध घोषणा देण्यात आल्या. विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण स्वातंत्र्यदिनी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तिसरी ते पाचवीच्या गटात चित्रकला स्पर्धेत प्रथम वेदिका परदेशी, द्वितीय राधिका भिल्ल तर तृतीय यश सोनवणे व सुकन्या सोनवणे आली. सहावी ते आठवीच्या गटात चित्रकला स्पर्धेत प्रथम संजना कोळी, द्वितीय दुर्गा परदेशी तर तृतीय वैशाली कोळी आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम श्रावस्ती इंगळे, द्वितीय भाग्यश्री सोनवणे तर तृतीय भाग्यश्री पवार आली. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम प्रियंका पाटील, द्वितीय सुशील इंगळे तर तृतीय श्रावस्ती इंगळे व नंदिनी चिंचोले आली. सामूहिक गीत गायन स्पर्धेत तिसरी ते पाचवीच्या गटात प्रथम शुभम कृष्णा रोनक रोहित, द्वितीय सिमरन राधिका अफसाना राशी तर तृतीय सुकन्या पल्लवी आयशा अश्विनी आली. सामूहिक गीत गायन स्पर्धेत सहावी ते आठवीच्या गटात प्रथम भाग्यश्री नंदिनी सिनम समीरा, द्वितीय महेक प्रेरणा प्रियंका दुर्गा तर तृतीय वर्षा भारती अस्मिता भारती आली. त्याचप्रमाणे नंदकिशोर सोनवणे यांच्यातर्फे प्रत्येक वर्गातील दोन विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिक देण्यात आली. दुसरीतील अनन्या गायकवाड व समृद्धी सोनवणे, तिसरीतील तेजस्विनी मोरे व पूर्वी भिल्ल, चौथीतील रूपाली नाईक व पूजा भिल्ल, पाचवीतील राधिका भिल्ल व वृषाली सोनवणे, सहावीतील वर्षा सोनवणे व अस्मिता भिल्ल, सातवीतील वैशाली कोळी व स्वाती सोनवणे, आठवीतील श्रावस्ती इंगळे व ममता गरूड यांना बक्षीस देण्यात आले. तसेच स्वराज्य महोत्सवाअंतर्गत महिला मेळावा, पालक सभा, माता पालक सभा तर 17 रोजी सामूहिक राष्ट्रगान घेण्यात आले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, विनोद जयकर, गणेश तांबे, डॉ. जगदीश पाटील, सुनंदा रोझोतकर, मंजुषा पाठक, सविता निंभोरे, ज्योती वाघ, साधना सूर्यराव आदींनी परिश्रम घेतले.