भुसावळ – येथील ब-हाटे शाळेतील इयत्ता पहिलीच्या मुला-मुलींना युनिफॉर्म वाटप करण्यात आले त्याचबरोबर एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी व भारत मातेची पूजन शाळेत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री परीक्षेत ब-हाटे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी या उपस्थित होत्या .
याप्रसंगी काही मुला-मुलींनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती देऊन भाषण सादर केले. आरती चौधरी यांनी आपल्या भाषणात मुला मुलींचे कौतुक करून त्यांना अभ्यास करून शाळेचे पर्यायाने भुसावळ चे नाव उज्वल करण्यासाठी प्रोत्साहन दिले अध्यक्ष परीक्षेत ब-हाटे यांनी शाळेच्या उपक्रमांविषयी माहिती देऊन महिला क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष आरती चौधरी व सदस्यांचे आभार मानले आभार मानले याप्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भारत माता पूजन ,लोकमान्य टिळक पुण्यतिथी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
मुंबईचे उद्योग हर्षीत दोशी यांनी त्यांची कन्या स्तुती दोशी हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेल्या आर्थिक मदतीतून ४० विद्यार्थ्यांना गणवेश वाटप महिला क्रिडा मंडळ भुसावळ च्या माध्यमातून करण्यात आले. गणवेश वाटप अध्यक्षा आरती चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
.कार्यक्रमाला सर्वांनी भारत मातेचा जयजयकार केला कार्यक्रमाला महिला क्रिडा मंडळाच्या सौ,लता होसकोटे जयश्री ओक ,प्रगती ओक, राजश्री कात्यायानी ,स्वाती भोळे, वैशाली भगत , सुनिता पाचपांडे ,संगिता पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापिका हेमांगीनी चौधरी यांनी केले,सूत्रसंचालन ममता फालक यांनी केले,कार्यक्रमाला माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पी जे चौधरी , रमाशंकर दुबेजी ,उपशिक्षिका ,मिनाक्षी चौधरी,जयश्री चौधरी ,आशा ठोंबरे ,पी,एम,परख समीर तडवी सर दीपक तायडे सर,उपस्थित होते,



