रावेर लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेची रावेर लोकसभेतील सर्व विधानसभा निहाय बैठक रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी संपन्न होणार आहे. या बैठकीत भुसावळ विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश राणे, चोपडा विधानसभा संपर्कप्रमुख सुधीर गडकरी, मुक्ताईनगर विधानसभा संपर्कप्रमुख विनोद चव्हाण, रावेर विधानसभा संपर्कप्रमुख मोहन मसुरकर, जामनेर विधानसभा संपर्कप्रमुख श्रीकांत पाटील उपस्थित राहणार आहे.

रावेर लोकसभेच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, रेल कामगार सेना, अल्पसंख्याक आघाडी, शिक्षक सेना, दिव्यांग सेना, एस टी कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक यांना विधानसभानिहाय बैठका घेऊन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर मार्गदर्शन करणार आहे. विधानसभानिहाय कार्यक्रम:रविवारी, सकाळी ९ वाजता चोपडा विधानसभा, दुपारी ११ वाजता रावेर विधानसभा, दुपारी १ वाजता मुक्ताईनगर विधानसभा, दुपारी ३ वाजता जामनेर विधानसभा व संध्याकाळी ५ वाजता भुसावळ विधानसभेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. भुसावळ व चोपडा विधानसभेच्या बैठकीला जिल्हाप्रमुख समाधान महाजन उपस्थित राहतील. भुसावळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे.


