रोटरी क्लब आँफ भुसावळ तर्फे 10 वी 12 वीच्या विद्यार्थी व पालकांसाठीआँनलाईन वेबिनार मार्गदर्शन :

भुसावळ – 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना व पालकांसाठी अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन पुण्याचे प्रसिद्ध मॅनेजमेंट कन्सल्टंट, लेखक, अभिनेते व इंजीनीअर डॉ. नितीन देशपांडे यांनी अत्यंत सोप्या भाषेत व योग्य रितीने केले. हे आँनलाईन वेबिनार 17 तारखेला 7. 30 वाजता सुरू झाले. सर्व प्रथम रोटरी क्लब ऑफ भुसावळचे अध्यक्ष राजेंद्र फेगडे यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात सांगितला.
या कार्यक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली.
डाॅ. नितीन देशपांडे हे पुण्याहून कार्यक्रमात सहभागी झाले होते. अत्यंत ओघवत्या भाषा शैलीत त्यांनी पालकांना व मुलांना मार्गदर्शन केले. अलिकडे विद्यार्थ्यांना खूप पर्याय उपलब्ध आहेत पण त्यामुळेच जास्त गोंधळ निर्माण होतो. तसेच फक्त मेडिकल इंजीनीअरींगच्या मागे न लागता इतरही पर्याय सुचवले तसेच काॅलेज निवडतांना काय काय गोष्टी बघणे आवश्यक आहे की ज्या मुळे फसवणूक होत नाही ते सुद्धा समजावून सांगितले.
नंतर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला. अनेक पालकांनी व विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले जसे.. प्राण्यांच्या डाॅक्टरला कोणकोणत्या क्षेत्रात संधी असते.. तसेच यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. परीक्षांसाठी अभ्यास कसा करावा किंवा एम. बी.ए. व एम एम.एस. मधील फरक व महत्व कोणत्या गोष्टीला आहे हे स्पष्ट केले. अशा रीतीने हे वेबिनार योग्य वेळी केल्याने अतिशय उपयुक्त ठरले अशी प्रतिक्रिया विद्यार्थी व पालकांनी दिली.
रोटरीचे जी.आर. ठाकूर, यांनी आभार प्रदर्शन केले.
या वेळी रोटरीचे महेश भराडे, सारंग चौधरी, ऋषीकुमार शुक्ला, राजेश अग्रवाल. विकास कात्यायनी. राजीव सैगल (उज्जैन) तर या व्यतिरिक्त
जयंत पुराणिक व रागिणी पुराणिक, डॉ. विकास कोळंबें, शितल अरोरा,ऋतुजा फेगडे डॉ. उर्मी ठक्कर व इतरही अनेक विद्यार्थी पालक, महाराष्ट्रातुन व महाराष्ट्राच्या बाहेररून सूध्दा सहभागी झाले होते.
चांगला उपयुक्त कार्यक्रम घेतल्या बद्दल रोटरी क्लब ऑफ भुसावळचे सर्वदुर कौतुक होत आहे.