भुसावळ – समाजातील गरजु पालकांच्या उपवर मुलामुलींचे लग्नाकरीता जुन्या रूढि व परंपरेनुसार असलेल्या काही चालीरीती तसेच आनाठायी खर्च यांना फाटा देत सामाजिक समस्या, व खर्चिक लग्न पध्दतीवर उपाय म्हणून या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याकरीता समाजातील प्रतिष्ठित एकत्र येवून सामूहिक विवाहाची कल्पना सुरु केली व लग्नासाठी लागणारा निधी तसेच संसारपयोगी साहित्य (आंदन ) भेट देवून १० जोडप्यांचे मंगळवार १९ एप्रिल रोजी सकाळी ब्रम्हमुहुर्तावर सामूहिक विवाह लावून लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला .
नात्यात संवाद महत्वाचा – आरती चौधरीं
जीवन साफल्याचे साधन गृहस्थाश्रमात या १० जोडप्यांचा प्रवेश करण्यापूर्वी सुखी वैवाहिक जीवनासाठी समुपदेशन कक्षाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी वधुवरांस हळद लागण्यापुर्वी संसार सुरळीत होण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी सौ चौधरीं म्हणाल्या की वधुवरांनी
एकमेकांना समजून घेऊन, एकमेकांच्या प्रती आदर ठेवून नात्याची सुरवात केली तर त्या नात्यामधे प्रेम वाढते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणत्याही नात्यात संवाद महत्वाचा असतो. हे नवदांपत्याने लक्षात ठेवावे तर ते नाते फुलते. असे सांगत सुखी समाधानी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्वपूर्ण प्रकारे मार्गदर्शन केले .
याप्रसंगी जळगावचे माजी महापौर व जळगाव भोर पंचायतचे अध्यक्ष विष्णू भंगाळे, ललित पाटील पाडळसे, डॉ. वर्षां कोळंबे, वैशाली भगत, जळगाव भोर पंचायतच्या नीला चौधरी, किरण चौधरी, अर्चना पाटील, सुनंदा चौधरी, शालीनी पाटील, विकास पाचपांडे, सुनीता पाचपांडे, यांचेसह कुटुंब नायक रमेश पाटील, भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेचे अध्यक्ष अँड प्रकाश पाटील, सचिव डाॅ बाळू पाटील, प्रोजेक्ट चेअरमन आरती चौधरी, स्वागताध्यक्ष सुहास चौधरी, माजी आ. निळकंठ फालक, महेश फालक, मंगला पाटील, शरद फेगडे, रघुनाथ चौधरी, डिगंबर महाजन आदीं मान्यवर उपस्थित होते .
यावेळी स्वागताध्यक्ष सुहास चौधरी यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाचा उद्देश थोडक्यात सांगीतला .
वधुवरांना संसारोपयोगी साहित्य, व आंदण वितरीत : दात्यांचा सत्कार —
संस्थे तर्फे प्रत्येक जोडप्याला गॅस शेगडी, सिलेंडर, मिक्सर, कुकर, संसारोपयोगी साहित्य, व आंदण वितरीत करण्यात आले.तसेच
ज्यांनी उस्फूर्त मदत केली अशा दात्यांचा सत्कार करण्यात आला.यामध्ये
प्राची राणे, महेश मधुकर चौधरी (खिरोदा.), ललीत महाजन (चिखली), सुधीर काशिनाथ चौधरी (अंजाळे), दिनेश राणे, वासु इंगळे, प्रमोद धनगर, मनोज जावळे, अरुण पाचपांडे, यांनी सहकार्य केले .प्रसंगी ललीत रमेश पाटील (पाडळसे) . डाॅ. प्रिया सरोदे (सावदा) यांनी नवदांम्पत्यास भेटवस्तू देण्यात आले .

गुरुजी अंनत जोशी, राहूल जोशी, खुशाल जोशी, यांनी वैदिक पध्दतीने लग्नविधी केले.
या १० वधुवरांचां झाला शुभविवाह :
संजय उमाकांत फेगडे-प्रियांका
भुषण निवृत्ती वारके-काजल गणेश फीरके, वैभव चंद्रकांत सरोदे-शिल्पा प्रल्हाद होले, सुरज सोपान बढे-वैष्णवी राजेंद्र सासले, नंदकिशोर फेगडे-ऐश्वर्या मनवाडे, रोषण कोल्हे – मोहीनी नेहते, देवेश पाटील – प्रियांका चौधरी, दिपक बढे-खुशबू, उमेश संतोष पाटील – चंद्रकला तानाजी लंके, उल्हास तुकाराम महाजन-सपना दिवाकर भोळे.
या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत विनीत हंबर्डिकर, उल्हास महाजन, नेहल लढे, दिपक चौधरी यांनी घेतली. तसेच या सोहळयात दीपक महाजन (गॅसवाले) हे या संपूर्ण कार्यक्रमाचे अन्नदाते होते.


