जळगाव : विजेसंबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता थेट महावितरणचे कर्मचारी तुमच्या दारात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांच्या वीजेसंबधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम महावितरणने हाती घेतला आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाला असून शेती पंपाच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्याचे तालुकानिहाय नियोजन केले जात असून जिल्ह्यात लवकरच याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमने यांनी दिली.

ग्रामीण भागातील वीज समस्या सोडण्यावर भर आहे. झुकलेले, मोडलेले वीज खांब उभे करणे, तारांना ताण देणे, जास्त झोळ असल्यास मधोमध नवीन खांब उभा करणे, स्पेसर लावणे, रोहित्राची व वितरण पेटीची दुरुस्तीची कामे करणे, अनधिकृत भार काढून त्यांच्यावर कारवाई करणे, नवीन कनेक्शन घेण्यास प्रवृत्त करणे आदी कामे केली जाणार आहेत. यासह वीज बिलातील त्रूटी, नावात बदल या तक्रारींचेही जागेवर निराकरण करण्याचे काम या उपक्रमातून होणार असल्याचे अभियंता हुमने यांनी सांगितले. विजेसंबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता थेट महावितरणचे कर्मचारी तुमच्या दारात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांच्या वीजेसंबधी अडचणी सोडवण्यासाठी ‘एक गाव एक दिवस’ हा उपक्रम महावितरणने हाती घेतला आहे. रब्बीचा हंगाम सुरू झाला असून शेती पंपाच्या वीज मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे या उपक्रमाचा शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. त्याचे तालुकानिहाय नियोजन केले जात असून जिल्ह्यात लवकरच याची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमने यांनी दिली.


