भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातर्फे गेल्या 5 वर्षांपासून महाविद्यलयातील अर्थशास्त्र विभाग व नियोजन अभ्यास मंडळ यांच्यावतीने दरवर्षी 2 ऑक्टो. म. गांधी जयंतीनमित्त महादेव माळ येथे खेड्याकडे चला हे अभियान राबवण्यात येते. या अभियानाअंतर्गत महादेव माळ हे गांव दत्तक घेतलेले असून येथे दरवर्षी 2 ऑक्टो. ला महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात येते. त्याअंतर्गत ग्रामस्वचछता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन याबाबत जनजागृती करण्यात येते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
आज दि. 2 ऑक्टो. रोजी महादेव माळ येथे महाविद्यालयातर्फे बांधलेल्या स्वच्छता गृहाचा लोकार्पण सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ सौ. एम.व्ही.वायकोळे आणि कु-हे पानाचे ग्रा.पं. सरपंच जीवन पाटील तसेच जि.प.शाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस.व्ही.पाटील, डाॅ. बी.एच.ब-हाटे, डाॅ.ए.डी.गोस्वामी, डाॅ. एन.ई.भंगाळे यांचेसमवेत ताराचंद बापू नाईक (ज्येष्ठ नागरीक, महादेव माळ),लक्ष्मण जाधव(ग्रा.पं. सदस्य), परशराम जाधव(वनसमिती अध्यक्ष), .सुभाष जाधव(अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती), अजय राठोड, विलास रंदाळे (उपसरपंच), गौतमदादा मेघे(ग्रा.पं. सदस्य), किशोर पाटील(ग्रा.पं. सदस्य), . संदीप महाजन (ग्रा.पं. सदस्य), प्रकाश जाधव, निलेश पाटील (उपशिक्षक) आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला.त्यानंतर राष्ट्रपिता म.गांधी व माजी दिवंगत पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वच्छतागृहांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांसमवेत चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा.डाॅ.किरण वारके, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.जितेंद्र आडोकार, रा.से.यो. चे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.आर.एस.नाडेकर,डाॅ.सौ. ममताबेन पाटील आदींनी परीश्रम घेतले.



