आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। वरणगाव येथे नियोजनपर बैठक संपन्न:
वरणगाव- विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार चंद्रकांत पाटील यांच्या दिनांक 14 सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम व लोकहितार्थ उपक्रम घेणे बाबतच्या नियोजनाची सभा शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांचे निवासस्थानी पार पडली . प्रसंगी वाढदिवसा निमित्ताने आरोग्य शिबिर 2D Eco तपासणी शिबिर रक्त तपासणी शिबीर, थायरॉईड तपासणी शिबिर ,तसेच लाडू तुला , शिवसेना सदस्य नोंदणी अभियान नामदार गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वागत व सत्कार असे विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले.

प्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक विलास मुळे मुस्लिम समाजाचे नेते हीप्पीभाई, जिल्हा परिषद सदस्य सौ सुरेखा कोळी , पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे , अल्पसंख्यांकाचे उपजिल्हा संघटक सईद मुल्ला, उपतालुका प्रमुख सुभाष चौधरी , वरणगाव उपतालुकाप्रमुख पप्पू सोनवणे ,उपतालुका संघटक प्रकाश कोळी, गणप्रमुख किशोर कोळी, उपशहरप्रमुख सुखदेव धनगर, संतोष माळी ,अजहर खान ,भूषण बाविस्कर , निलेश ठाकूर ,मुजाहिद खान, निलेश सुरडकर ,पंकज पाटील ,अमर सोनार , आबा सोनार ,महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका योगिता सोनार ,आचेगावचे माजी उपसरपंच आबा पाटील , काहूरखेडा सरपंच विनोद पाटील, फुलगावचे ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील ,सुसरीचे ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील , संदीप पाटील , तळवेल प्रवीण माळी , पवन माळी , किरण माळी , यांचेसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक उपस्थित होते .


