आदीवाशी भागातील अन्यायग्रस्त कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत चौकशीची अनिसतर्फ़े मागणी

भुसावळ – चंद्रपूर जिल्हयातील आदिवासी दुर्गम ग्रामीण भागात काळीजादू, भानामती, करणी आदी बाबींमुळे समाजावर होत असलेल्या सामूहिक अत्याचाराला आळा घालण्यासाठी ठळक उपाय योजन्याबरोबरच भ्रमाविरुध्द जागृती अभियान कार्यक्रम राबवून अन्यायग्रस्त कुटुंबावर झालेल्या अत्याचारीची चौकशी करून अंधश्रद्धायुक्त कृत्य करणाNयांवर कडक कार्यवाही करून कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्पेâ नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांना निवेदन देण्यात आले.
समाजात कालांतरपासून विविध प्रकारचे रोग, दुःख, समस्याग्रस्त प्रश्न सोडविण्यासाठी तथाकथित भ्रामक उपाय योजना निर्माण केलेल्या आहेत. जुन्या काळात समाजात शिक्षणाचा अभाव असल्याने मोठया प्रमाणात भ्रामक उपायांचा प्रचार झाला. त्यामुळे समाजात अद्यापही भय, गैरसमज मोठया प्रमाणात जाणवत आहेत. त्यात जादू, काळीजादू, भानामती, करणा, चेटुक बंगाली जादू, भुतबाधा आदी प्रकाराच्या तथाकथित संकल्पनेतून समाज बाहेर आलेला नाहा. २१ व्या शतकातही यामध्ये काही बदल झालेला दिसत नाही.


चंद्रपूर जिल्हयातील अति दुर्गम भागात याप्रकाराची समाजात मोठया प्रमाणात भिती असून याच संशयापोटी जिवणी गावातील ग्रामस्थानी एका विशिष्ट समाजावर करणीचा संशय घेवून व सार्वजनिकरित्या बांधून जबर मारहाण केली. हा प्रकार अंगावर शहारे निर्माण करणारा असून निंदनीय आहे. असे अनेक प्रकार तेथे घडत आहेत. यामुळे समाज आजही भयभीत आहे. स्वतंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही हा प्रकार घडावा, हे शासन व्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल. करणी, भानामती विशिष्ट समाज करतो असा गैरसमज तेथे मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. नंदूरबार पॅटर्न चंद्रपूर येथे राबवावा. नंदूरबार जिल्हात चेटकी या प्रकाराने आदिवासी भागात मोठया प्रमाणात भय निर्माण झालेला होता. त्यामुळे तेथे अनेक संशयीत महिलांवर चेटकीण म्हणून बहिष्कार बरोबरच मारहाण, अत्याचारमुळे अनेक कुटुंब उध्दवस्त झालेले आहे. अनेक महिलांचा येथे बळी गेलेला आह. अंधश्रध्दा निर्मलून समितीने याबाबत पुढाकार घेवून या भागात मोठया प्रमाणात चेटूक या भ्रामक भिताबाबत जनजागृती निर्माण केलेली आहे. यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला थोडे यश आले तरी यासाठी अदयापही तेथे प्रबोधन व जनजागृतीची गरज भासत आहे. जादूटोना, भानामती, करणी, चेटूक, चकवा, भुतबाधा हा प्रकार अस्तित्वात नसून भ्रामक कल्पना आहे. हे येथील समाजात रूजविण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील अति दुर्गम ग्रामीण भागात सरकारने प्रबोधनपर जागृती कार्यक्रम आखण्याची गरज भासत आहे. ही बाब सरकारने गांर्भीयाने घ्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच येथील अन्यायग्रस्त कुटुंबाची चौकशी करून आरोपीवर कठोर कार्यवाही करावी. तसेच अत्याचारग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत घोषित करावी, अशी मागणी हे निवेदनव्दारे करण्यात आली आह. यावेळी अनिसचे एस.एस.जाधव, सागर बहिरूणे, अरूण दामोदर, शामकुमार वासनिक, दलित पँथरचे सिध्दार्थ सोनवणे, भगवान निरभवणे, सुरेश गणवीर, मुरलीधर सोनवणे, काँग्रेस अनुसूची जाती जमाती शहराध्यक्ष सुनील जवरे, आरपीआयचे पप्पू सुरळकर, विलास खरात आदींच्या निवेदनावर स्वाक्षNया आहेत.