तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी गुन्हे शाखेच्या जळ्यात :
जळगाव : शहरातील जुना आसोदा रोड परीसरात हातात तलवार घेवून दहशत निर्माण करणार्या संजय सदाशीव कोळी (41, रा.जुना आसोदा रोड जवळ) यास अटक करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी ही कारवर्इा केली. संशयीतास अधिक कारवाईसाठी शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

शहरातील जुना आसोदा रोड काशीनाथ पाटील नगर जवळ संशयीत आरोपी हा हातात धारदार तलवार घेवून आरडा-ओरड करत येणार्या-जाणार्या लोकांमध्ये दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहा.फौजदार अशोक महाजन, अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, चालक विजय चौधरी यांनी सोमवारी सायंकाळी सहा वाजता धाव घेत संशयीत आरोपी संजय कोळी याला अटक केली. पथकाने आरोपीच्या ताब्यातील धारदार तलवार हस्तगत केली. संशयीताला शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.


