विद्यालयातच प्रेमी यूगलाची गळफास घेऊन आत्महत्या ; भडगांव तालुक्यातील वाडे येथील घटना ;

भडगांव- भडगांव तालुक्यातील वाडा येथील विद्यालयाल रात्री एका प्रेमी यूगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्या परिसरात खळबळ उडाली आहे

याबाबत वृत्त असं की भडगाव तालुक्यातील वाडे येथील माध्यमिक विद्यालय रात्री एक तरुण आणि तरुणीने गळफास घेतल्याची घटना घडली आहे मैत्री दिनाला घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .

प्राथमिक माहितीनुसार हे प्रेमी यूगल असून आपल्या विवाहाला समाज मान्यता मिळणार नाही याच्या भितीपोटी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते माध्यमिक विद्यालयाचे पहिल्या मजल्यावर जिन्यावर जाऊन गळफास घेत त्यांनी आपली जीवनयात्रा सपविली आज सकाळी दहा वाजेच्या सूमारास हा भयंकर प्रकार उघड झाला यांची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थासह भडगांव पोलीस स्थानकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा यातील तरूण हा मुकेश कैलास सोनवणे (वय 22 रा वाडे तालुका भडगांव)आंणि १९ वर्षीय तरूणी ही नेहा बापू ठाकरे (वय 19 रा वाडे तालुका भडगांव असल्याचे समजले हे दोन्ही एकाच समाजांचे असल्याचेही वृत्त आहे या दोन्ही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे तर या प्रकरणी पोलीस पाटील अरविंद फकीरा पाटील याच्या ख़बरीवरून भडगांव पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पी एस आय सुशील सोनवणे पीएसआय पठारे ईश्वर पाटील लक्ष्मण पाटील हे करत आहे