भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथील उच्चशिक्षित वैद्यकीय क्षेत्रात पदवीधारक व उत्कृष्ट शेतकरी असलेले सचिन दामू सपकाळे यांची युवा मोर्चा भुसावळ तालुका उपाध्यक्षपदी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .

प्रसंगी भुसावळ भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील युवक तालुकाध्यक्ष जितु कोळी किसान मोर्चा तालुका अध्यक्ष संजय पाटील साकेगाव माजी सरपंच अनिल पाटील उपसरपंच आनंद ठाकरे सरपंच पती विष्णू सोनवणे आदींची उपस्थिती होती
साकेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तसेच गावातील युवा वर्ग व उत्कृष्ट शेतकरी असलेले तरुण नवयुवक सचिन सपकाळे यांची भुसावळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी आमदार संजय भाऊ सावकारे यांनी संपूर्ण तालुक्यात युवा मोर्चा चे काम जोमाने वाढावे व पक्ष संघटन मजबूत व्हावे अशा उद्देशाने स्वप्निल सपकाळे यांची भुसावळ तालुका युवा मोर्चा उपाक्षपदी निवड केली आहे.
तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पुढील उपक्रम तसेच निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून जबाबदाऱ्या वाटप उपक्रमाला सुरुवात झालेली आहे स्वप्निल च्या निवडीबद्दल समस्त साकेगाव ग्रामस्थांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे


