भुसावळ : शहरात योजनेच्या काम दिलेल्या ठेकेदाराला नियमांचा विसर पडला असून पालिका प्रशासनाने या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा भुसावल शहर काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी व्यक्त केली आहे. भुसावळ शहरात अमृत योजनेचे पाईप लाईन अंथरताना ठेकेदाराला काही अटी -शर्ती घालून देण्यात आल्या होत्या मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर रस्ते करण्याचा ठेकेदाराला विसर पडला असून शहरात पाईपलाईनच्या कामामुळे चांगल्या रस्त्यांची वाताहत झाल्याची तक्रार मो.मुन्वर खान यांनी केली आहे. जो पर्यंत शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदाराकडून केली जात नाही तोपर्यंत ठेकेदाराला बिल अदा करू नये व या संदर्भातील जवाबदारी पालिकेची, असे असेही खान यांनी जिल्हधिकारी व भुसावळ प्रांताधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.



