भुसावळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर – ४५ रक्तदात्यांनी केले रक्तदान ;


भुसावळ –
शिवसेना माजी खासदार तथा रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुल यांचे आदेशाने येथिल रेल कामगार सेना भुसावळ विभागाच्यावतीने शहरातील रेल्वे रुग्णालयात सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते की कोरोनाची महामारी व अतिवृष्टिमुळे शेतकरी व नागरिक यांचे झालेले नुकसान पाहता माझा वाढदिवस धूमधड़ाक्यात साजरा न करता सामाजिक उपक्रम घेवुन गोर-गरीबांना व रुग्णाना मदत होईल असे उपक्रम करा.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून मुख्य चिकीत्सा निर्देशक डॉ श्रवणकुमार, सहाय्यक चिकीत्सा निर्देशक डॉ कश्यप,जे एम जगताप होते.यावेळी डॉ श्रवणकुमार यांनी रक्तदान करण्याचे महत्व पटवून दिले, ते म्हणाले की तीन महिण्यातून किमान एकदा तरी रत्कदान करावे,रक्तदान केल्याने नुकसान होत नाही,चोवीस तासात फ्रेश रक्त पुन्हा आपल्या शरीरात तयार होते.कोरोना सारख्या महामारित रक्तदान शिबिरचे आयोजन केल्यामुळे रेल कामगार सेनेचे विशेष कौतुक केले.
यावेळी रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललीतकुमार मुथा,प्रितम टाक,योगेश माळी,विनोद वाघे,मंगू खंडू शेलोडे,प्रकाश करसाळे,मुकुंद मोरे,इश्वर पाटील,राजेश तायडे,शुभम चौव्हान,मोहन राजपूत,शांताराम सपकाळे,महेंद्र सोनवणे, संजय चौधरी,भरत शर्मा,एम के शाह,समीरसिंग,सुनिल उबाळे,प्रमोद हिवरे, किरण मलबारी,मुकेश महाजन,विजय पाटिल,राजेश नकवाल,आर एस पाठक,एस एन बोकाडे,अरविंद थोरात,संदीप जावले, कमलाकर बाणाईत,पंकज ठाकरे,रमेश मराठे,सुरेद्र यादव,राजू सुरवाडे,महेश गुजर,गोविंदा कुमार आदी उपस्थित होते तर शिवसेनेने जिल्हाप्रमुख समाधान महाजन,उपजिल्हाप्रमुख प्रा उत्तम सुरवाडे,प्रा घिरज पाटील,विलास मुळे,बबलू बऱ्हाटे,संतोष सोनवणे,दिपक धांडे,आर एस सोनार आदींनी शिबीराला भेट दिली.भुसावळ विभागातील रक्तदाते रक्तदान करायला आले होते,या वेळी ४५ रेल्वे कर्मचारी व लोकांनी रक्तदान केले. रक्तदात्याना 1 हेल्मेट,1 पेन व 1 N95 मास्क देण्यात आला ,कोरोनाचे सर्व नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व रेल कामगार सेनेचे पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.