भुसावळ –
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख ना.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निरोगी दीर्घायुष्य लाभण्यासाठी तसेच महाराष्ट्रासह भारत देशावरील कोरोनाचे व महापुराचे संकट दूर व्हावे, सर्व नागरिकांना सुख, समृद्ध आणि निरोगी आयुष लाभावे या उद्देशाने भुसावळ शिवसेना शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी महापूजेचे आयोजन गायत्री मंदिरात केले होते.
यावेळी जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, माजी तालुका प्रमुख निळकंठ फालक, तालुका संघटक धिरज पाटील, माजी नगरसेवक दीपक धांडे, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका पूनम बऱ्हाटे, तालुका संघटिका भूराबाई चव्हाण, माजी नगराध्यक्षा माधुरी फालक, उपशहरप्रमुख पवन नाले, नामदेव बऱ्हाटे, रोहिदास चव्हाण, विक्की चव्हाण, युगेंद्र काकडे, चेतन भोई उपस्थित होते.



