खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) – तालुक्यातील खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची अचानक तडकाडकी बदली झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी 2015 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप या ग्रामसेवक यांच्यावर आहेत . गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून त्यांनी सांगितले की खंडाळा ग्रामसेवक विजय काकरवाल यांची पाचोरा तालुक्यात बदली झाली असून सध्या अतिरिक्त पदभार एक ऑगस्ट च्या पुढे देण्यात येईल. खंडाळा ग्रामसेवकांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे गावात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे .



