यावल भुसावळ मार्गावर ट्रक व मोटरसायकल अपघात ; एक ठार एक जखमी ;

यावल – येथील यावल भुसावळ मार्गावरील रस्त्यावर मोटरसायकल व अज्ञात ट्रकच्या झालेल्या भिषण अपघातात एक ठार व जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथे घडली . अज्ञात ट्रकचालक वाहन उलट दिशेला घेवुन पसार झाला .
या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , यावल ते भुसावळ मार्गावरील जुन्या भुसावळ नाक्यावर दिनांक २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास यावल कडून भुसावळकडे जात असलेल्या मोटरसायकल क्रमांक एमएच १९ बी २१८o७ या आपल्या मोटरसायकल वाहनाने यावल येथील आठवडे बाजार परिसरातील राहणारे रहिवासी
शेख शकील शेख ईबा , ( मिस्त्रि) वय ४७ वर्ष आणी दहिगाव येथील मेहमुद खान फकीरा खान , वय ५२ वर्ष हे दोघ ही बांधकाम कारागीर भुसावळकडे कामाला जात असतांना भुसावळकडुन यावलच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात दोन जणं गंभीर जखमी झाले असुन यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे .

अपघात झाल्यानंतर सदरचा ट्रकचालकाने आपल्या ताब्यातील मोटरवाहनाची दिशा पालटुन पुन्हा भुसावळच्या दिशेने पसार झाला . दरम्यान जखमींना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके , अधिपरिचारिका निलीमा पाटील , आरोग्य सेवक कादर तडवी यांनी प्रथम उपचार केल्यावर दोघांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले असता शासकीय रुग्णवाहिकेने घेवुन जात असतांना भुसावळ जवळ रुग्णवाहिकेत यावल येथील गंभीर जखमी असलेले शेख शकील शेख ईबा यांचा रुग्णवाहिकेत उपचारापूर्वीच मृत्यु झाला .