अज्ञात वाहनाच्या धडकेत बँक कर्मचार्‍याचा मृत्यू : मुलगी गंभीर जखमी –

जळगाव – भुसावळहून जळगाव येथे निघालेल्या बँक कर्मचार्‍याच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बँक कर्मचार्‍याचा मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी खेडीजवळ घडली. या अपघातात प्रकाश शाम जोशी (46, रा.भुसावळ) यांचा मृत्यू झाला तर त्यांची कन्या आदिती (18) ही जखमी झाली.

दोन्ही बाप-लेक दुचाकी (एम.एच.19 डी.एम.9071) ने भुसावळहून जळगाव येथे जळगाव येथे खेडी गावाजवळील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने प्रकाश जोशी यांचा डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला तर त्यांची मुलगी आदिती जखमी झाली. रविवारी सकाळी 8.45 वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला असून एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी अतुल श्रीकांत पाठक यांच्या फिर्यादीनुसार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.