भुसावळ (प्रतिनिधी )-
महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्ष सलंग्नित प्रहार शैक्षणिक व सामाजिक बहुउद्देशिय संघटना तर्फे नामदार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांचे वाढदिवसा निमित्त ३० जुन ते ५ जुलै हा “समाजहित- समाजभान ” सप्ताह साजरा करण्यात येत आहे .यानिमित्त आज शनिवार रोजी मोफत नेत्रतपासणी शिबीर संपन्न झाले .
स्थानिक ब्राम्हण संघाजवळ नेत्रम आय हॉस्पिटल येथे आयोजित शिबीराचे उदघाटन डाॅ.वंदना वाघचौरे यांचे हस्ते करण्यात आले,
शिबिरात नेत्ररोग तज्ञ डाॅक्टर सुनिल मेश्राम यांनी नेत्र तपासणी केली, शिबिरात ६० रुग्नांनी लाभ घेतला.
प्रसंगी समाजहित जोपासण्याकरिता विकासदादा घुगे ,कृष्णांत दादा गायकवाड , कृष्णादादा बोदेले ,
यांचे मार्गदर्शन लाभले. वाढदिवसाचे दिवशी अवाढव्य खर्च टाळुन गरजुंना अत्यावश्यक वस्तु व सुविधांचा लाभ व्हावा यासाठी तसेच कोविड १९ चे महामारीत नागरिक वेगवेगळ्या संकटांना तोंड देत आहे, त्यानाही आधार मिळावा म्हणून सौ राजश्री नेवे यांच्या सौजन्याने
जिल्ह्यात विविध उपक्रम घेण्यात येत आहे आज सकाळी ११ ते २ या दरम्यान या शिबीराचे आयोजन केले होते , यांत सुमारे 60 ते 65 लोकांनी लाभ घेतल्याचे जळगाव जिल्हा आघाडी प्रमुख सौ.राजश्री उमेश नेवे यांनी सांगितले.
यावेळी राजश्री नेवे, माया चौधरी,वंदना झांबरे,स्मिता माहुरकर, अनुराधा टाक, कामिनि नेवे, आराधना टाक, भाग्यश्री नेवे यांचेसह संघटनेचे पदाधिकारी सखी श्रावणी महिला संस्था पदाधिकारी , गौसेवा परिवार समिती सदस्य , उमेश नेवे, राहुल पांडव आदीं उपस्थित होते, यशस्वितेकरिता
नेत्रम आय हाॅस्पिटल , स्टाफ ,यांचे सहकार्य लाभले,



