भुसावळ :

अत्यावश्यक सेवेतील किराणा व भाजीपाला विक्री दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिली. कोरेानाच्या डेल्टा प्लस व्हॅरिएंटच्या धोक्यामुळे 27 जूनपासून नवीन नियम लागू करण्यात आले आहे. या नियमांनुसार शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, फळविक्री आदी दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहतील. तर उर्वरित सर्व दुकाने या दोन्ही दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. भुसावळ पालिका प्रशासनाने या नवीन नियमांची माहिती समजून घेण्यासाठी शहरात प्रबोधन म्हणून जाहिर सूचना दिली आहे.


