भुसावळ (प्रतिनिधी )-

तालुक्यातील खंडाळा ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमी योजनेत लाभार्थ्यांना दिलेल्या शौचालयाच्या कामाची चौकशी करून ग्रामसेवक, रोजगार सेवक व सरपंच हे जबाबदार असल्यावर या सर्वांवर शासनाची फसवणूक करणे दिशाभूल करून भ्रष्टाचार करणे प्रतिबंध कायद्याने कारवाई करावी अशी मागणी व चौकशी राष्ट्रीय दलित पँथरचे तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांच्याकडे केली आहे
सविस्तर असे की खंडाळा ग्रामपंचायत अंतर्गत गावातील लाभार्थ्यांना स्वच्छालय बांधकाम करणे कामी सन २०१६-१७ ते २०१७-१८ ते २०१८-१९ ते २०१९-२० या कालावधीत अनुदान देण्यात आले आहे त्यामध्ये ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी एकाच लाभार्थ्यांचे नावे दोन वेळा अनुदान काढण्यात आले आहे व त्यांना गरज नाही अशा लाभार्थ्यांना सुद्धा अनुदान मंजूर करून यांनी हा निधी लाटला आहे तर काही लाभार्थ्यांना अनुदान देऊन सुद्धा त्यांची शौचालय बांधकाम केलेले नाही म्हणून या कामाची चौकशी करून ग्रामसेवक रोजगार सेवक यांना निलंबित करून शासनाची फसवणूक व दिशाभूल करणे व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करावी अशी तक्रार दि. १५ फेब्रुवारी ला २०२१ ला उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे केलेले आहे परंतु यांनी सदर तक्रारीची चौकशी ही भुसावळ गट विकास अधिकारी यांच्याकडे सोपवली आणि गट विकास अधिकारी यांनी ती चौकशी भुसावळ पंचायत समिती येथील रोजगार हमी योजना सहाय्यक अधिकारी एम आर इ जी एस विभाग पंचायत समिती भुसावळ व शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्याकडे सोपवली व यांनी दिलेल्या यादीप्रमाणे चौकशी न करता संपूर्ण यादीतील फक्त चौदा लोक असे घेतले की त्यांनी घर बांधकाम करतानांच घरात शौचालय बांधले आहे आणि तसाच चौकशी अहवाल सादर केला तो अहवाल मला प्राप्त झाल्यावर मी त्याची शहानिशा केली असता आणि जी तक्रार केली होती ती ग्रामसेवक यांनी दिलेल्या यादीवरून केलेली आहे त्यातील 14 लोक लाभार्थी मग बाकी लाभार्थी गायब कसे…? म्हणून सदर अहवाल मान्य न करता परत उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुन्हा त्या कामाची चौकशी करावी व चौकशी करते वेळी तक्रारदाराला सोबत घेऊन चौकशी करावी अशी तक्रार केली आहे
मात्र उपकार्यकारी अधिकारी यांनी तो चौकशी अहवाल भुसावळ गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी दिलेला चौकशी अहवाल बरोबर असून इतर लाभार्थ्यांना लाभ दिलेला नाही त्यांची नावे डिलिट करण्यात आली आहे व मी तक्रार ग्रामसेवक यांनी दिलेल्या यादी वरूनच केलेली आहे आणि त्याच यादीतील 14 लोक यांनी शोधून चौकशी केली आणि ते सुद्धा सेवानिवृत्त काही लाभार्थ्यांचे मुले नोकरीला मग कष्टकरी शेतकरी दलित यांना या योजनेचा लाभ का दिला गेला नाही..? का ग्रामसेवक यांनी अर्जदाराला चुकीची माहिती दिली..? का फक्त ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि चुकीची माहिती दिली असेल तर ग्रामसेवक यांनी अर्जदाराला अर्जदाराची नाही तर शासनाची सुद्धा दिशाभूल केलेली आहे म्हणून ही संपूर्ण यादी सोबत घेऊन त्यात दिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक पासबुक व बँकेचे स्टेटमेंट ग्रामपंचायतचे रोजगार हमी योजनेचे बँक पासबुक आणि तक्रारदाराला सोबत घेऊन सदरची चौकशीही रोजगार हमी योजना विभाग जिल्हा परिषद जळगाव व येथील अधिकारी व जळगाव बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता, भुसावळ तहसील येथील रोजगार हमी योजना अधिकारी यांच्यामार्फत ही चौकशी करावी व ग्रामसेवक व रोजगार सेवक तसेच या प्रकरणाला सरपंच जबाबदार असल्याचा या सर्वांवर शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणे अर्जदाराला खोटी माहिती पुरवणे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी व चौकशी राष्ट्रीय दलित त्यानंतरचे तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे


