भुसावळ (प्रतिनिधि )-
भारतातील सर्व वकील वर्गास केंद्र शासनाने आर्थिक पॅकेज जाहिर करावे अशी मागणी भुसावळ येथील अडँ. अभिजित मेने यांनी केली असून याबाबत पंतप्रधान यांना ऑनलाइन पोर्टल द्वारा निवेदन देण्यात आले आहे .
निवेदनात नमूद आहे की ,
वकिल हा उपजीविका कमविणे साठी पूर्ण पणे वकिली व्यवसाय वर अवलंबून आहे,कायदे प्रमाणे वकिली सोडून वकीलाला दुसरे कोणतेही उत्पन्नाचे व्यवसाय करता येत नाही. मार्च 2020 पासून कोरोना विषाणु महामारीमुळे न्यायालय नियमित कामकाज करू शकत नाही यामुळे , वकील वर्गातील बहुतांश वकीलावर आर्थिक संकट येत आहे, वकिलांनी नेहमी देशाच्या विकास साठी योगदान दिले आहे,आज सरकारने वकील वर्गा च्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे आहे,तरी सरकारने याविषयाला प्राधान्य देऊन,एक समिती गठित करून वकिली व्यवसायाच्या आर्थिक अडचण वर अहवाल तयार करून, देशातील सम्पूर्ण वकिलांसाठी आर्थिक रिलिफ पॅकेज घोषित करावे अशीही मागणी अडँ. अभिजित मेने यांनी केली आहे .



