भुसावळ (प्रतिनिधि )-
भुसावळ रेल्वे विभागात आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने मध्ये आज दिनांक 19 रोजी कवी संमेलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. आपल्या देशाला स्वातंत्र मिळून 75 वर्षे झाली आहेत त्या निमित्ताने ह्या वर्षात देशभर आजादी का अमृत महोत्सव या संकल्पने मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे भुसावळ मंडळ द्वारा देश भक्ती कवितांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलन आभासी बैठकी (वर्चुअल मीट) द्वारे कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून करण्यात आले.
कवी संमेलनात सहभागी रेल्वे कर्मचारी आणि शिक्षक कवी होते. संतोषकुमार उपाध्याय, एम जे साळुंके, अजित पाठक, ओमप्रकाश बाघेल, अनिल कुमार तिवारी या सर्व कवींनी जोषपूर्ण देशभक्ती पर कवितांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेक कुमार गुप्ता डी आर एम यांनी कवी संमेलनाचे विशेष कौतुक केले आणि सर्व कवींनी आपल्या कवितांच्या माध्यमातून
रोमारोमात देश भक्ती असलेल्या कविता सादर केली. गुगल मीट च्या माध्यमातून प्रतिपादन केले.
गुगल मीट च्या माध्यमातून मनोज कुमार सिन्हा ए डी आर एम , एन डी गांगुर्डे सीनी डी पी ओ, रेल्वे अधिकारी, रेल्वे कर्मचारी आणि शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सतीश कुळकर्णी प्राचार्य रेल्वे स्कूल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्मिक विभाग, देवेंद्र विश्वकर्मा डी बी ए , रेल्वे विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



