कोविड रुग्णांना देशात कुठेहि उपचार घेता यावा – शिशिर जावळे यांची पंतप्रधान मोदीजी यांचेकडे मागणी. परराज्यातील कोविड रुग्णावर उपचार नाकारणाऱ्या राज्यांचे अनुदान रोखावे.


भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृत्यू दराचे प्रमाण सुद्धा आधी वाढत झालेले आहे. कोरोनाबाधित रुग्ण अंतिम टप्यात अपुऱ्याआक्सिजन व बेड उपलब्ध होत नसल्याने गंभीर अवस्थेत दाखल होण्याचे प्रमाण सुद्धा वाढत असल्यामुळे अपुरे बेड, अपुऱ्या ऑक्सिजन अभावी जीव वाचवण्यासाठी आपापल्या राज्यांच्या शेजारील जवळील राज्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण जीव वाचविण्यासाठी कोविड उपचारांसाठी दाखल होत आहेत. मात्र नुकतेच जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना मध्य प्रदेशातील काही रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बंदी करण्यात आली आहे.त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड होतेय. रुग्णाच्या नातेवाईकांची यामुळे प्रचंड दमछाक्र होतेय, याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे अतिशय चुकीचं आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. भारत सार्वभौम व लोकशाहीप्रधान राष्ट्र असून भारतातील प्रत्येक व्यक्तीला नागरी स्वातंत्र्य असून, भारतात तो कुठेही राहू शकतो कोणत्या राज्यात राहू शकतो आणि कोणत्याहि राज्यामध्ये तेथील सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देणे हा संबंधित संबंधित राज्यांच आद्य कर्तव्य आहे. मात्र भारतात अशाप्रकारे जे राज्य परराज्यातील त्यांचे कडे उपचारासाठी येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी बंदी घालीत असतील, वेठीस धरीत असतील अशा सर्व राज्यांना भारत सरकारे केंद्राने त्यांचे कडून विविध योजनानसाठी देण्यात येणारे सर्व अनुदान त्वरित रोखावे. व संबंधित कोरोना बाधित रुग्णांना परराज्यातून आलेत म्हणून रुग्णसेवा नाका रणाऱ्या सर्व रुग्णालय व तेथील डॉक्टरांचे परवाने रद्द करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन राठोड यांचे कडे केली आहे.तसेच याबद्दल मध्यप्रदेश मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना हि याबद्दल निवेदन पाठविले असल्याचे जावळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *