भुसावळ (प्रतिनिधी )-
अतिरिक्त गाड्यांची घोषणा करणे हे रेल्वे सेवांना हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग आहे. रेल्वे प्रशासन सर्वांना आवाहन करीत आहे की, कोविड १९ च्या अशा आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वेच्या अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंग च्या संदर्भात पॅनिक बुकींग असा तर्क काढणे टाळावे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे उन्हाळ्यात जास्त गाड्या चालवत असते.
कोविड19 चा संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी दिली आहे.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.



