भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात वाढत्या तापमानासोबत उष्माघाताचा धोका वाढला असून अशा रुग्णांवर उपचारासाठी पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात उष्माघात कक्ष स्थापना करणार असल्याची माहिती आरोग्य सभापती प्रा.दिनेश राठी यांनी दिली. भुसावळ हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. रेल्वे, एमआयडीसी, वीटभट्टी व्यवसायिक, गवंडी कामे करणार्या मजुरांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. दरम्यान, गेल्या वर्षी उन्हाळ्यात कोरोनाचे लॉकडाउन होते. यामुळे लोक घराबाहेर निघाले नाहीत. परीणामी उष्माघाताचे रुग्ण कमी होते. यंदा लॉकडाउन नसल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात लवकरच उष्माघात कक्ष स्थापन होईल, असे आरोग्य प्रा. राठी यांनी सांगितले.



