भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील खडका येथे बांधकाम साहित्य गोदामाला आग लागुन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदेवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही .
भुसावळ तालुक्यातील खडका चौफुली सर्व्हे नंबर १५ मधील शेख जावेद शेख इक्बाल यांच्या बांधकाम गोदाममध्ये शुक्रवारी आग लागली . या आगीमध्ये बांधकाम साहित्य व एक मोटारसायकल जळून खाक झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाले .ही आग कश्यामुळे लागली याचे अद्याप कारण समजले नाही . नगरपालिका अग्निशामक दलांना माहिती देऊनसुद्धा ते घटनास्थळी दाखल झाले नाही त्यामुळे साहित्य जळून खाक झाले शेवटी स्थानिक लोकांनी घरातील पाणी आणून आणि एक खासगी टँकर मागवून आगीवर नियंत्रण मिळवले . या आगीमुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही पण ही आग इतकी भीषण होती की जर वेळेवर नियंत्रण मिळाले नसते तर मोठा अनर्थ झाला असता असे स्थानिक लोकांनी सांगितले . नगरपालिकेच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून आली.



