भुसावळातील महिलेवर अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिला भुसावळातील एका महिलेशी झालेल्या नाजूक विषयावर झालेल्या वादानंतर जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी चार वाजता भुसावळात आल्यानंतर सोमवारी दुपारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात हा वाद पोहोचला होता. उभयंतांमधील वादाची दरी पोलिसांनी मिटवत महिलेचा गैरसमज दूर केल्यानंतर 35 वर्षीय महिला पोलिस ठाण्याबाहेर पडली व दगडी पुलाकडे निघाली असतानाच 25 ते 30 वर्षीय तरुणाने भांडण झालेल्या महिलेने बोलावल्याचे सांगत दुचाकीवर बसवून निर्जन जागी नेवून तिचेवर शारिरिक अत्याचार केला व पिडीत महिलेला तक्रार करण्याची किंवा मदत मागण्याची संधी मिळु नये या उद्देशाने तिचे कपडे व मोबाईल फोन जाळुन टाकले. त्यानंतर त्या अज्ञात ईसमाने घटनास्थळी पडलेला मोठा दगड उचलुन तो पिडीत महिलेला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यावर मारत असतांना पिडित महिला तेथुन पळत हायवेला असलेल्या एका पेट्रोल पंपावर आल्या व तेथील लोकांची मदत घेऊन पोलीसांना संपर्क साधला . पोलीसांनी त्यांना सुरक्षितरित्या पोलीस ठाण्यात आणुन सहायक पोलीस निरिक्षक रुपाली चव्हाण यांना त्यांची विचारपुस करुन त्यांची तक्रार नोंद करुन घेतली.धक्कादायक घटना सोमवारी रात्री 9.30 ते 11.30 दरम्यान घडली

अतिशय गुंतागुंतीचा व कुठलाही पुरावा नसताना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अभ्यासपूर्ण पद्धत्तीने गुन्ह्याचे विश्‍लेषण करीत हा गुन्हा सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक व बाजारपेठ व शहर पोलिसांच्या मदतीने उघडकीस आणला आहे.
या प्रकरणी शिव कॉलनी, रेल्वे दुनिया परीसर भुसावळ येथील
आरोपी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ ( वय 28) यास अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.अधीक्षक अर्चित चांडक, सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुनगहू, तालुक्याचे सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे हवालदार जितू पाटील, अनिल पाटील, अयाज सैय्यद, रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, दीपक पाटील, गीता कश्यप, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्‍वर भालेराव, दिनेश कापडणे, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जीवन कापडे, सचिन चौधरी, प्रशांत सोनार, आशा बावस्कर यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *