भुसावळात दुचाकी अपघात : आरोपीस साडेसहा हजार रुपये दंड –

भुसावळ (प्रतिनिधी )-

विरुद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवून दुसर्‍या दुचाकी चालकास धडक देवून दुचाकींचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीताला साडेसहा हजार रुपये दंडाची शिक्षा भुसावळ न्यायालयाच्या न्या.डी.एस.शिंदे यांनी सुनावली. दंडातील तीन हजारांची रक्कम अपघातात जखमी झालेल्यास देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. खटल्याची हकीकत अशी की, संशयीत हासीम रफिक खाटीक (मामाजी टॉकीजजवळ, गवळीवाडा, भुसावळ) यांनी बेपर्वाईने दुचाकी (एम.एच.19 आर.3896) चालवत राहुल प्रकाश मोरे यांच्या दुचाकी (एम.एच.19 बी.एच.0441) ला धडक दिल्याने मोरे हे जखमी झाले होते. या प्रकरणी शहर पोलिसांनी फिर्यादी होत गुन्हा दाखल केला होता. भुसावळ न्यायालयात न्या.शिंदे यांच्या न्यायासनापुढे सुनावणी चालली. न्यायालयाने भादंवि 279 अन्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, भादंवि 337 अन्वये 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, भादंवि 338 अन्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद, 184 अन्वये एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून एएसआय सुनील खोडपे यांनी काम पाहिले. सरकारतर्फे सरकारी वकील अ‍ॅड.नितीन खरे यांनी युक्तीवाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *