रेल्वे तिकीटांची ब्लॅकमध्ये विक्री – पावणेतीन कोटींचा दंड वसुल 492 दलाल अटकेत –

भुसावळ (प्रतिनिध )-

 एकापेक्षा जास्त वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटांचा काळाबाजार करण्याच्या आणि विशेष गाड्यांमध्ये आरक्षित आसने अडवून ठेवण्याच्या तक्रारी आल्यामुळे मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा तिकीट दलालाविरूद्ध मोहीम अधिक तीव्र केली. आरपीएफच्या पथकाने सायबर सेल आणि इतर इंटेलिजेंस इनपुटमधून प्राप्त केलेल्या माहितीच्या आधारे छापेमारीही केली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागांवर हे छापे टाकण्यात आले. मध्य रेल्वेच्या, रेल्वे सुरक्षा दलाने वर्ष 2020 दरम्यान, रेल्वे कायद्याच्या तरतुदींनुसार 466 गुन्हे दाखल करण्यात आले. या छापेमारी दरम्यान दोन कोटी 78 लाख रुपये किंमतीची एकूण 14 हजार 343 तिकिटे जप्त करण्ययात आली. ज्यात 14 हजार 65 ई-तिकिटे आणि 278 काऊंटर तिकिटांचा समावेश आहे. 492 जणांना अटक करण्यात आली. मध्य रेल्वेवर नोंदविण्यात आलेल्या या 466 प्रकरणांपैकी 253 गुन्हे हे मुंबई विभागात दाखल करण्यात आले. एक कोटी 43 लाख रुपये किंमतीची सात हजार दोन तिकिटे जप्त करण्यात आली. ज्यात सहा हजार 863 ई-तिकिटे आणि 139 काउंटर तिकिटांचा समावेश आहे. या प्रकरणी एकूण 262 जणांना अटक करण्यात आली. प्रामाणिक प्रवाशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि स्क्रिप्टिंग सॉफ्टवेअरच्या वापरासह अनैतिक घटकांच्या अनधिकृत तिकीट विक्रीच्या घटना रोखण्यासाठी ही तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *