पाचोरा :

अत्याचारातून युवती गर्भवती होवून तिने मुलीला जन्म दिल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे घडली. या प्रकरणी पोलिसात सहा संशयीतांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२० वर्षीय युवती नातेवाईकांकडे राह असताना गावातील संशयीत आरोपी समीनाबाई तडवी या महिलेने संबंधित युवतीवर दबाव टाकून गावातील निंबा सावळे, निलेश, शिवाजी (पूर्ण नाव माहित नाही), गोपाल पाटील, बापु उर्फ संजू आढाव यांनी 20 सप्टेंबर 2019 पासून वेळोवेळी बलात्कार केला. यास प्रतिकार केला असता तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना गोपाल कैलास पाटील यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये घडली. अत्याचारानंतर पीडीता गर्भवती होवून तिला मुलगी झाली. याप्रकरणी पिडीत युवतीच्या फिर्यादीवरून सहा जणांवर पिंपळगाव हरे. पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास डीवायएसी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक नीता कायटे व सहकारी करीत आहे.


