भुसावळ रेल्वे विभागातील 40 कर्मचारी सेवानिवृत्त ; वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृत्ती समारंभ संपन्न ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी 40 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले, सेवानिवृत कर्मचार्याना रेल्वे तर्फे 10 कोटी 46 लाख रुपये त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन स. कार्मिक अधिकारी राजेंद्र परदेशी यांनी केले
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे करण्यात आले तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन खंडवा, नांदगाव भुसावळ , मनमाड ,नाशिक, बुरहानपुर, जलगांव इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल लेखा अधिकारी चंद्रकांत कदम यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच या कार्यक्रमात वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे व सर्व स.कार्मिक अधिकारी व वित्त विभागाचे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार स.कार्मिक अधिकारी बी एस रामटेके यांनी व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वितेसाठी निपटान, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *