भुसावळ (प्रतिनिधी )-

साकेगाव तालुका ग्रामपंचायतीने नुकताच स्मार्ट व्हिलेज पुरस्कार प्राप्त करून जिल्हास्तरीय दोन नंबर असून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीने केलेला संकल्प निश्चितच इतर ग्रामपंचायतीसाठी आदर्श असून पंचायत समिती त्यासाठी पूर्णपणे सहकार्य करणार असे प्रतिपादन सभापती वंदनाताई उन्हाळे यांनी सत्कार समारंभाला उत्तर देताना केले
24 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती सौ वंदनाताई उन्हाळे व उपसभापती सौ प्रितीताई पाटील पंचायत समिती सदस्य सुनील महाजन सदानंद उन्हाळे आदींनी साकेगाव ग्रामपंचायतीला भेट दिली
यादरम्यान त्यांचा विद्यमान सरपंच योगिता कोळी उपसरपंच आनंद ठाकरे माजी सरपंच अनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय पाटील सुभाष कोळी इं. गांधी माध्यमिक विद्यालयचे चेअरमन दिलीप सिंग पाटील सुरेश पाटील माणिक पाटील सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य आदींनी सत्कार केला प्रसंगी उपसरपंच ठाकरे यांनी ग्रामपंचायती च्या विकसनशील प्रगतशील उपक्रमा संदर्भात प्रास्ताविक करताना ग्रामपंचायतीने मिळविलेल्या पायलेट प्रोजेक्ट व्हिलेज सन्मान पुरस्कार जिल्हास्तरीय पायाभूत सुविधा पुरस्कार राज्यस्तरीय झालेले नामांकन तथा ग्रामपंचायतीचे विविध उपक्रम व भविष्यामध्ये साकेगाव ग्रामपंचायत राज्यस्तरीय मॉडेल विलेज निर्मितीसाठी विद्यमान सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एक मताने करीत असलेले प्रयत्न व मायक्रो प्लॅनिंग सभापती महोदय समोर मांडले यावर सभापती सौ.उन्हाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायतीने सर्व योजना उत्कृष्ट तसेच काटेकोर व शिस्तबद्ध पद्धतीने अमलात आणलेले दिसत असून साकेगाव ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने स्वच्छ सुंदर स्मार्ट विलेज असून ते राज्यस्तरीय मॉडेल व्हिलेज निर्माण व्हावे यासाठी पंचायत समिती सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे सागर सोनवाल कुंदन कोळी, गजू पवार गणेश कोळी भूषणसिंग राजपूत, सुभाष सोनवणे विष्णू कोळी राजेंद्र पाटील विलास ठोके अजय चौधरी संतोष पाटील धनराज भाई साबिर पटेल सह समस्त ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची व गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती


