भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ नगर पालिकेत २५ लाख रुपये शिल्लक असलेला तसेच कुठलीही कर वाढ नसलेला व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी दिड कोटी विशेष निधी मंजूर केलेला २१४ कोटींचा अर्थसंकल्प आज २६ फेब्रुवारी २०२१ रोजी
मंजूर करण्यात आला आहे .
सकाळी ११ वाजेला नगरपरिषद सभागृहातून नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन सभा
घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार , यांचेसह पालिकेतील अधिकारी उपस्थित होते . २१४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला असून त्यात शिल्लकीचा २५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प
मंजूर करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची कर वाढ करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी दिड कोटी विशेष निधी अर्थसंकल्पात उपलब्ध करून घेण्यात आलेला आहे. तसेच इतर विकास कामांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेले आहे.तसेच शहरातील पालिकेच्या शाळा,हायस्कुल मधील विद्यार्थ्यांसाठी कश्या प्रकारे सोयी सुविधा देता येतील याकरीता जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात येणार असून याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. तसेच शहरातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे. हा अर्थसंकल्प एक नवीन आशा व दिशा दाखवनारा ठरणार असल्याने लवकरच शहर विकासात्मक कामे होतील यासाठी शहरवासियांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे .
विकासाचे पर्व पुढील काळात सुद्धा सुरू राहील – रमण भोळे
२५ कोटि निधी शील्लक असलेला २१४ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर झाल्याने
हा अर्थसंकल्प विकासात्मक कामे करण्यासाठी दिशा दाखवणारा ठरेल यामुळे
विकासाचे पर्व पुढील काळात सुद्धा सुरू राहील अशी आशा यावेळी नगराध्यक्ष रमण भोळे यांनी व्यक्त केली .



