भुसावळकरांना दिलासा : अर्थसंकल्पीय सभेत करवाढ नाहीच ! –


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळकरांना आगामी अर्थसंकल्पीय सभे मोठा दिलासा मिळण्याची आशा असून या सभेत कुठलीही करवाढ होणार नसल्याची दाट शक्यता आहे. नाशिक महसूल विभागातील अ वर्ग दर्जाच्या भुसावळ पालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा शुक्रवार, 26 सकाळी 11 वाजता ऑनलाईन होणार आहे. सभेसाठी प्रशासनाने तयारी सुरू पूर्ण केली आहे. आगामी काळात पालिकेच्या निवडणुका असल्याने भुसावळकरांवर कुठलाही कराचा बोजा न पडण्यासाठी या अर्थसंकल्पीय सभेत करवाढ करण्यात आली नसल्याचे सूत्रांकडून समजते.
गेल्या काही वर्षांपासून पालिकेत शिलकीचा व करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केला जातो. यंदा अर्थसंकल्पात करवाढ होणार नसल्याची दाट शक्यता आहे. शहरात कोणत्या महत्वाच्या योजना, कामे प्रस्तावित केल्या जातात? त्यावर किती तरतूद होते? कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती पाहता आरोग्याला प्राधान्य मिळते किंवा नाही? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे आदींच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *