रीक्षा चालकास मारहाण : दोन महिन्यांपासून फरार तिघा भावंडांना अटक ; पोलिसांची कामगिरी :


जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील महेंद्र पितांबर ठाकरे (40) यांना लाकडी दांडक्यासह लोखंडी पट्टीने मारहाण करन त्याच्या खिशातील पाच हजार रुपये रोख व मोबाईल लांबविल्याची घटना 1 डिसेंबर 2020 रोजी घडली होती. याप्रकरणी गुन्ह्यात पसार असलेल्या शिवा देवीदास बाविस्कर, ज्ञानेश्‍वर देवीदास बाविस्कर व कुंदन देवीदास बाविस्कर (तीन्ही रा. नागझिर्रीें ता.जळगाव) यांना शनिवारी शहर पोलिसांनी अटक केली आहे
महेंद्र ठाकरे हे रीक्षा चालक आहेत. 1 डिसेंबर रोजी ठाकरे हे रीक्षा घेवून जळगाव शहरातील जुने बसस्थानकाजवळ आले. याठिकाणी त्यांन शिवा बाविस्कर भेटला. ठाकरे व बाविस्कर दोघांनी सोबत मद्यप्राशन केले. यावेळी बाविस्कर याने ठाकरे यांच्यासमोर त्याची बहिण मीना कोळी यांना शिवीगाळ केली. यानंतर ठाकरे यांनी शिवा बाविस्कर याच्या कानशिलात लगावली. त्याचा राग येवून शिवा हा त्याचे भाऊ ज्ञानेश्‍वर व कुंदन यांना घेवून आला. ज्ञानेश्‍वरसह कुंदन व शिवा या तिघा भावंडांनी लाकडी दंडुका तसेच लोखंडी पट्टीने महेंद्र ठाकरे यांना मारहाण केली. मारहाणीत ठाकरे हे बेशुध्द पडले. याचवेळी ठाकरे यांच्या खिशातील पाच हजार रुपये व मोबाईल लांबवून तिघांनी पळ काढला होता. यानंतर एका रीक्षा चालकाने ठाकरे यांना देवकर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले होेते. याप्रकरणी ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्ह्यात पसार असलेल्या संशयिताबाबत शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक भीमराव नांदुरकर यांच्यासह तेजस मराठे, विजय कोळी, बापू मोरे, योगेश सपकाळे यांच्या पथकाने ज्ञानेश्‍वर बाविस्कर, कुंदन बाविस्कर या दोघांना अमळनेरातूून अटक केली. यानंतर सायंकाळी शिवा बाविस्कर यालाही ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *